लाच घेऊन कर्ज देणार्‍या 8 अधिकार्‍यांना अटक

November 24, 2010 2:47 PM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर

देशात एकीकडे मोठे घोटाळे उघड होत असताना सीबीआयनं आता एक कर्ज महाघोटाळा उघड केला आहे.सीबीआयनं एक कर्ज महाघोटाळा उघड केला आहे. देशभरातील सार्वजनिक क्षेत्रात कर्जवाटप करणार्‍या संस्थांमधील उच्चपदांवरील आठ अधिकार्‍यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे सीईओ रामचंद्रन नायर यांना अटक केली आहे. लाच घेऊन कर्ज देण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. बँँक ऑफ इंडियाच्या जनरल मॅनेजरनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत 5 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत आणि एकूण 8 अधिकार्‍यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँकच्या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. रियल इस्टेट डेव्हलपर्सना कर्ज देण्यासाठी यासगळ्यांनी लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

close