अवकाळी पावसामुळे 1 हजार कोटींच नुकसान

November 24, 2010 8:56 AM0 commentsViews:

24 नोव्हेंबर

अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. नुकसानीचा हा आकडा 1 हजार कोटींच्या घरात जातो. याचा मोठा फटका नाशिक जिल्ह्याच्या अर्थकारणाला बसणार आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळं 10 लाख हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 50 टक्क्यांहून अधिक नुकसान 4 लाख हेक्टरवरील पिकांचं तर 6 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान 50 टक्क्‌यांपेक्षा कमी झालं आहे. असं असलं तरी सर्वच शेतकर्‍यांना सरसकट मदत मिळावी असं आपलं मत असून मंत्रीमंडळाच्या बुधवारी होणार्‍या बैठकीत ते मांडू असं कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. कांदा, द्राक्ष, कापसाबरोबरच भाजीपाल्याचंही नुकसान अवेळी पावसानं झालं असून कृषी तसेच महसूल खात्यातर्फे पंचनामे सुरू असल्याची माहीतीही विखे पाटील यांनी दिली.

close