मुंबईत साध्वी प्रज्ञासिंग हिची नार्को टेस्ट

October 31, 2008 10:10 AM0 commentsViews: 2

दिनांक 31 ऑक्टोबर-मुंबई,श्रीरंग गायकवाडमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हिची नार्को टेस्ट होणार आहे. त्यासाठी तिला मुंबईतल्या वाकोला इथल्या फोरेन्सिक लॅब इथं नेण्यात आलंय. या बॉम्बस्फोट प्रकरणी आत्तापर्यंत एटीएसनं पाच लोकांना अटक केली आहे. त्यात एक माजी लष्करी अधिकारी आहे. 29 सप्टेंबरला मालेगावात बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळी स्फोटकात वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा उर्फ पूर्णचेतनानंद हिची असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर तिच्यासह इतर इतर दोघांना अटक करण्यात आली.

close