आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी किरण कुमार रेड्डी

November 24, 2010 6:07 PM0 commentsViews: 6

24 नोव्हेंबर

आंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून किरण रेड्डी यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिल्लीहून आलेल्या पक्ष निरिक्षकांनी आमदारांशी चर्चा केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. रेड्डी हे सध्या आंध्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अंतर्गत राजकारणामुळे बेजार झालेल्या रोसय्या यांनी बुधवारी राजीनामा दिला होता. तेलंगणाचं राजकारण आणि जगन रेड्डींनी केलेलं बंड हाताळण्यात त्यांना अपयश आलं होतं. त्यामुळंही काँग्रेस हायकमांड त्यांच्यावर नाराज होती. गुरुवारी रेड्डी यांचा शपथ विधी होणार आहे.

close