नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री

November 25, 2010 9:30 AM0 commentsViews:

25 नोव्हेंबर

अवकाळी पावसानं शेतकर्‍यांच्या नुकसानाचा अहवाल मागवून त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये दिली आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते कराडमध्ये आले होते. इथल्या कृषी बाजार समितीत कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन भरले आहे. मुख्यमंत्र्यांनी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. याठिकाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, सतेज पाटील यांनीही हजेरी लावली. मुख्यमंत्री झाल्यावर पृथ्वीराज चव्हाण पहिल्यांदाच आपल्या होम पीचवर म्हणजे कराडमध्ये जाहीर कार्यक्रमात बोलले आहेत.

close