आधुनिक महाराष्ट्राच्या शिल्पकारास त्रिवार अभिवादन

November 25, 2010 10:06 AM0 commentsViews: 4

25 नोव्हेंबर

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज 26 वी पुण्यतिथी आहे. त्याच निमित्तानं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज कराडमध्ये यशवंतरावांच्या समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम यशवंतरावांनी केलं. आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबरच केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री अशी अनेक महत्वाची पदं भूषविली. त्यांच्या विचारांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचं स्थान आहे.

close