सिंधुदुर्गात लेप्टोस्पायरोसिसचे 21 बळी

November 25, 2010 10:17 AM0 commentsViews: 3

25 नोव्हेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिसचं थैमान सुरूच आहे. लेप्टोनं आणखी तीन जणांचा बळी घेतला आहे. आत्तापर्यंत 21 जण या तापाने दगावले आहेत. मात्र अजूनही लेप्टोसदृश्य तापाच्या रुग्णांना रक्तपेशी म्हणजेच प्लेटलेट्स् द्यायची यंत्रणा जिल्हा रुग्णालयानं कार्यान्वित केली नसल्यामुळे तापाचे रुग्ण दगावण्याचा धोका वाढला आहे. काल पुन्हा कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयात तापाचे आणखी 23 रुग्ण दाखल झाले असून त्यांच्या रक्त-चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे हे बळी लेप्टोनेच जातायत की अन्य कोणता विषाणू आहे हे तपासण्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने एन आय व्ही ची मदत घ्यायची ठरवली आहे. जिल्हाआरोग्य यंत्रणेची ही बेफिकीरी रुग्णांच्या जीवावर बेतत आहे.

close