इंदिरा गांधी यांचा चोविसावा स्मृतिदिन

October 31, 2008 11:10 AM0 commentsViews: 4

31 ऑक्टोबर- दिल्ली, 31 ऑक्टोबर हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या चोविसाव्या स्मृतिदिनी त्यांना सा-या देशभर आदरांजली वाहण्यात आली. 1966 ते 1977 या काळात त्यांनी भारताचं पंतप्रधान पद भूषवलं. एक अत्यंत कार्यक्षम,धोरणी,चाणाक्ष आणि धडाडीच्या पंतप्रधान म्हणून त्या ओळखल्या जातात. 1971 चं भारत आणि पाकिस्तान युद्ध त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं जिंकलं. 1974 साली पहिली अणूचाचणी त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं केली. संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय, बँकांचं खाजगीकरण यादी निर्णय त्यांच्याच कारकीर्दित घेण्यात आले. आणीबाणी लावण्याच्या निर्णयावरून त्यांच्यावर बरीच टिकाही झाली. पण त्यांची चाणाक्षनीती, कार्यक्षमता त्यांचे विरोधकही मान्य करतात. 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

close