आंध्रचे नवे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांचा शपथविधी सोहळा संपन्न

November 25, 2010 10:30 AM0 commentsViews: 4

25 नोव्हेंबर

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसैया यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॉग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत रेड्डी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली होती. आज (गुरुवारी) किरण कुमार रेड्डी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते आंध्राचे 16 वे मुख्यमंत्री आहेत. किरण कुमार रेड्डी यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष होते. दिवगंत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे सुपुत्र जगन रेडड्ी यांचे आव्हान नव्या मुख्यमंत्र्यांपुढे असेल. किरण कुमार रेड्डी हे दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे विश्वासू मानले जातात. मात्र त्यांच्या मृत्युनंतर किरण कुमार यांनी जगन यांच्यापासून दूरावाच ठेवला.

close