कोची टीम रद्द होणार ?

November 25, 2010 10:44 AM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर

आयपीएलच्या कोची टीमचा फैसला येत्या रविवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला होणार आहे. पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार कोची टीम रद्द होणार हे आता निश्चित आहे. टीम मालकांमध्ये असलेला वाद अजून मिटलेला नाही. आणि टीम फ्रँचाईजींनी बीसीसीआयला पत्र लिहून टीम रद्द करण्याची विनंती केली आहे. दोनच दिवसांपूर्वी मंगळवारी त्यांचं हे पत्र बीसीसीआयला पोहोचलं आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी पत्र मिळाल्याची कबुलीही दिली. कोची टीम रद्द झाली तर नवीन टीमसाठीची निविदा प्रक्रिया 28 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे.

close