इफ्फी मध्ये अशोक कुमार यांच्या ‘बंदिनी’ च स्क्रिनींग

November 25, 2010 12:06 PM0 commentsViews: 4

25 नोव्हेंबर

गोव्यात सुरू असलेल्या 41 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचा माहोल आता रंगत चालला आहे. यंदाचं वर्ष हे कलाकार अशोक कुमार यांचं जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्यांच्या बंदिनी या सिनेमाचं इफ्फी मध्ये स्क्रिनींग करण्यात आलं. सिनेमाच्या स्क्रिनींग नंतर अशोक कुमार यांचा पुतण्या अमित कुमार तसेच अशोक कुमार यांची मुलगी अनुराधा पटेल यांनी पत्रकारांशी भरभरुन गप्पा मारल्या. यावेळी अमित कुमार यांनी 'कोई हम-दम ना रहा' हे गाणं आपले काका अशोक कुमार तर वडिल किशोर कुमार या दोघांच्या स्टाईलमध्ये गाऊन दाखवले.

close