अव्वाच्या सव्वा दर लावणार्‍या एअरलाइन्सवर यापुढे कारवाई होणार

November 25, 2010 5:06 PM0 commentsViews: 1

25 नोव्हेंबर

प्रवाशांना अव्वाच्या सव्वा दर आकारणार्‍या विमान कंपन्यांवर यापुढे कारवाई केली जाईल असा इशारा नागरी हवाई वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय. आज त्यांनी डीजीसीएच्या अधिकार्‍यांना विमान कंपन्यांनी वाढवलेल्या दरांचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिलेत. प्रवाशांना परवडतील असेच तिकीट दर असावेत असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. नफेखोरीसाठी अव्वाच्या सव्वा दर वाढवण्यार्‍या कंपन्यांना यापुढे दंड भरावा लागेल किंवा जेलची हवा खावी लागेल असा इशाराही प्रफुल्ल पटेल यांनी दिलाय.

close