कर्ज घोटाळ्याची सीबीआय चौकशी सुरु

November 25, 2010 5:15 PM0 commentsViews: 2

25 नोव्हेंबर

देशाला हादरवून टाकणार्‍या हाऊसींग लोन महाघोटाळ्याची सीबीआयनं चौकशी सुरू केली आहे. देशभरातलल्या सार्वजनिक क्षेत्रात कर्जवाटप करणार्‍या सात बँक अधिकार्‍यांना बुधवारी सीबीआयनं अटक क ेलीय. कर्जाचे पैसे स्टॉक मार्केटसाठी वापरल्याचा या पाच कंपन्यांवर आरोप आहे. तसंच सीबीआयनं 16 कंपन्यांनाही नोटीस पाठवली आहे. कर्जवाटप, पैश्या संदर्भात झालेल्या व्यवहारांची संपूर्ण माहिती त्यांनी या अधिकार्‍यांना मागितली आहे. उद्यापर्यंत या व्यवहारासंदर्भातले संपूर्ण कागदपत्र सादर करण्याचे आदेशही या अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. तसंच मुंबईतल्या कंपन्यांशी या अधिकार्‍यांच्या असलेल्या संबंधांचंही त्यांना स्पष्टीकरण मागण्यात आलंय.

close