मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा – पटेल

November 25, 2010 5:38 PM0 commentsViews: 6

25 नोव्हेंबर

मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं. मुंबई राष्ट्रवादीच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज मुंबईत सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातल्या नेत्यांना पद आणि सत्तेच्या गुर्मीत न राहता कार्यकर्त्यांना बळ द्यावं अशा शब्दात सुनावलं. सर्व पदं आपल्यालाच मिळाली पाहिजे असं काहींना वाटते मात्र दुसर्‍यांनाही संधी दिली पाहिजे. ज्यांना आत्तापर्यंत संधी मिळाली नाही आता त्यांना संधी दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलतांना सर्व नेत्यांनी मुंबईत कार्यकर्त्यांना कोणी विचारत नाही अशी व्यथा दादांसमोर मांडली.

close