शहीद तुकाराम ओंबळेंच्या कुटुंबियांना सीएनजी पंपाचं वाटप

November 26, 2010 9:51 AM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल आमीर कसाबला जिवंत पकडताना शहीद झालेले सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबळे यांच्या कुटुंबियांना आज सीएनजी पंपचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांच्या हस्ते याचं वितरण करण्यात आलं. ओंबळेंची मुलगी वैशाली हिनं त्याचा स्वीकार केला.

तुकाराम ओंबळे यांनी अतुलनीय शौैर्य दाखवत नि:शस्त्र असतानाही कसाबला पकडलं. कसाब पकडला गेला नसता तर पाकचा खरा चेहरा जगापुढे आला नसता, या शब्दात गृहमंत्री पी.चिदंबरम यांनी ओंबळे यांना श्रध्दांजली दिली. 26/11 हल्यामागच्या सुत्रधांराना अटक करण्याचे शब्द पाकने पाळला नाही. अशा शेजार्‍यापासून सावधान राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. शहिद तुकाराम ओंबळे याच्या कुंटुबियांना सीएनजी पेट्रोल पंपाच हस्तांतरण करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

close