कसाब भेटीवर शिवसेनाप्रमुखांची कठोर टीका

November 26, 2010 9:59 AM0 commentsViews: 4

26 नोव्हेंबर

गृहमंत्री आर आर पाटील आणि विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या कसाब भेटीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बरसले आहेत. 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. सामान्य लोकांच्या भावना पायदळी तुडवत तुम्हाला बेशरमपणे कसाबला भेटण्याची गरज काय आहे या शब्दात ठाकरे यांनी दोघांना फटकारलं आहे. राज्य कुणासाठी करता आहात असा सवालही ठाकरेंनी विचारला आहे. अफजल गुरुचं जे झालं तेच कसाबचं होईल असा टोलाही त्यांनी लगावला.

close