शिवसेनेची शाहरुख खानवर पुन्हा टीका

November 26, 2010 10:21 AM0 commentsViews: 3

26 नोव्हेंबर

शिवसेनेनं पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खानला टार्गेट केलय शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून शाहरुखवर टिका करण्यात आलीय. 26/11 हल्ल्याला आज दोन वर्षे पूर्ण होत असतांना शाहरुख खान मात्र पाकिस्तानी चॅनेलसाठी नाच-गाण्यासह डिनर पार्टीचा कार्यक्रम करण्यात मशगूल आहे असं वृत्त देण्यात आलं. यापूर्वी सुध्दा आयपीएल स्पर्धेतून पाक खेळांडूना वगळल्यावर खानने प्रचंड थयथयाट केला होता. शेवटी शाहरुख खानचे शेपूट वाकडे ते वाकडेच आहे अशी टिका सामना वृत्तपत्रात करण्यात आली. ए गाला डीनर विथ शाहरुख खान असं या कार्यक्रमाचं नाव असून लंडनमध्ये हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलाय. प्राईम टिव्ही या चॅनेलसाठी शाहरुख हा कार्यक्रम करतोय. गेल्या दहा वर्षापासून या चॅनेलचे युरोपातील पाकिस्तानी जनतेसाठी 24 तास प्रक्षेपण सुरु करण्यात आलेत.

close