आसाम बॉम्बस्फोटांमागे हुजी संघटनेचा हात असल्याचा संशय

October 31, 2008 10:45 AM0 commentsViews: 5

31 ऑक्टोबर – गुवाहटीआसामची राजधानी गुवाहाटीसह चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या 13 बॉम्बस्फोटांमध्ये 70 जण ठार झाले तर 400 हून अधिक जखमी झालेत. या शक्तिशाली स्फोटांची जबाबदारी अजून कुठल्याही संघटनेनं स्वीकारली नसली, तरी हुजी संघटनेचा यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान गृहमंत्री शिवराज पाटील आसामला भेट देण्याची शक्यता आहे. दीपावलीच्या खरेदीत आणि आनंदात नागरिक व्यस्त असताना आसाममधल्या गुवाहाटी , कोकराझार, बारपेटा आणि बोंगाईगाव ही शहरं शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. दरम्यान आसाम सरकारला याबाबतीत आधीच सावध करण्यात आलं होत, असं केंद्रानं म्हटलंय. इथल्या सुरक्षिततेसाठी केंद्रानंही निमलष्करी दल पाठवलं असून, संपूर्ण आसाम शहरात हाय अ‍ॅलर्ट जाहीर करण्यात आलाय.

close