आजच्या दिवशीच कसाबला फाशी द्या – राज ठाकरे

November 26, 2010 10:56 AM0 commentsViews: 6

26 नोव्हेंबर

गृहमंत्री आर. आर. पाटील आणि विरोधी पक्ष नेता एकनाथ खडसे यांनी 26/11 हल्लातील मुख्य आरोपी अजमल कसाबला आर्थर रोड कारागृहात जाऊन भेट घेतली. या प्रकरणी यांनी लोकांच्या संवेदना मेल्या असल्याने लोक असे वागतात आजच्या दिवशीच कसाबला फाशी द्या अशा शब्दांत गृहमंत्री आर आर पाटील आणि एकनाथ खडसे यांच्या कसाब भेटीवर राज ठाकरे यांनी टीका केली.

शाहरुखवर ही टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठोपाठ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही शाहरूखवर जोरदार टिका केलीय. सामाजिक जाणीवा मेल्याकी अशाच गोष्टी होतात. शाहरुख खानच्या चित्रपटावर सामाजिक बहिष्कार घातला जात नाही. तोपर्यंत असला निर्लज्जपणा सुरुच राहणार या शब्दात राज ठाकरे यांनी शाहरुखला फटकार लगावली आहे.

close