लवासाप्रकरणी अण्णा हजारे आणि विरोधक आक्रमक

November 26, 2010 5:05 PM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर

लवासाप्रकरणी विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. लवासाला केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस बजावल्यापाठोपाठ येत्या नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षही लवासावरून सत्ताधार्‍यांना घेरणार असल्यानं लवासा मुद्दा पुन्हा पेटणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजसेवक अण्णा हजारेही 1 डिसेंबरपासून आळंदीमधे उपोषणाला बसणार आहे. शिवसेना आमदार नीलम गोर्‍हे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना राज्यासरकार लवासाला टॅक्समाफी देत असल्याचा आरोप करत लवासाला जमीन कशी दिली यावर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात असल्याचंही सांगीतलं. लवासाशिवाय आदर्शसारखे वेगवेगले भूखंड घोटाळेही अधिवेशनात काढले जाणार असल्यानं नागपूरचं अधिवेशन हे घोटाळा अधिवेशन म्हणून गाजेल अशी टिप्पणी गोर्‍हे यांनी केली.

close