अजून जखमा ओल्या

November 26, 2010 5:37 PM0 commentsViews: 2

26 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण झालेत. या दुर्घटनेनंतरही अनेकांच्या जीवाची ससेहोलपट सुरुच आहे. त्यातून अनेकजणं पूर्णपणे बरे होऊ शकलेले नाहीत. तर काहीजण मानसिक धक्क्यातून सावरु शकलेले नाहीत.

माझगाव डॉकयार्ड रोडचा हा परिसर 26/11 च्या हल्ल्यावेळी या परिसरात एका टॅक्सीत बॉम्बस्फोट झाला. त्यात दहाजण ठार झाले. तर काहींच्या शरीरात टॅक्सीच्या पत्र्याचे तुकडे शिरले. त्यापैकीच एक आहे तिसरीत शिकणारा सोयल शेख. याच्या डोक्यातही पत्र्याचे तुकडे गेलेत. जखमींना मिळणारी पन्नास हजार रुपयांची मदतही त्याला मिळालीय. एवढे उपचार होऊनही त्याच्या डोक्यात शिरलेले पत्र्याचे तुकडे मात्र तसेच आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणार्‍या अब्दुल शेख यांना आता मुलांवर पुढचे उपचार कसे करायचे असा प्रश्न सतावतोय. अशा जखमा घेऊन जगणार्‍या निरागस जीवांना सरकार काहीतरी मदत करणार की नाही, हाच खरा प्रश्न आहे.

close