शेतकर्‍यांच्या नुकसानी बाबत तातडीने बैठक घेणार

November 26, 2010 5:50 PM0 commentsViews: 7

26 नोव्हेंबर

अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना पावसाळामुळे होणार्‍या नुकसानीच्या भरपाईचे निकष तयार करण्यासाठी राज्य सरकार आता तातडीने बैठक घेणार आहे. अवकाळी पावसाने होणार्‍या नुकसानीची भरपाई देण्यासाठीचे निकषच आतापर्यंत राज्य सरकारकडे नव्हते. त्यामुळे हे निकष तयार करण्यासाठी तातडीची बैठक घेतली जाईल अशी माहिती पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज सांगलीत दिली. अवकाळी पावसासंदर्भातल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. अतीवृष्टीसंदर्भात राज्यसरकारनं निकष केलेले आहेत आणि त्यानुसार नुकसान भरपाई दिली जाते. मात्र सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसानं राज्यातल्या द्राक्ष, डाळिंब तसेच अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेत. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत त्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पतंगराव कदम यांनी यावेळी दिली.

close