आदर्श सोसायटीची महत्वाची कागदपत्र गहाळ

November 27, 2010 9:14 AM0 commentsViews: 1

27 नोव्हेंबर

आदर्श घोटाळ्या प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती पुढं आली आहे. वादग्रस्त आदर्श सोसायटीच्या मूळ फायलीतून काही महत्वाची पानं गहाळ झाली आहेत. सर्व संबंधित विभागांकडे शोधूनही ती पानं सापडत नसल्यामुळे अखेर नगरविकास विभागानं मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुरुदत्त वाजपे यांनी या संबंधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी 204 आणि 380 कलमांअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 30 ऑगस्ट 09 ते 1 नोव्हेबर 10 दरम्यान ही कागदपत्र गहाळ झाल्याची एफआयआर मध्ये नोंद आहे.

close