लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यावर आज अंत्यसंस्कार

November 27, 2010 9:35 AM0 commentsViews: 2

27 नोव्हेंबर

लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं पार्थिव नागपूरहून मुंबईला आणण्यात आलं आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ मुंबई विमानतळावर उपस्थित होते. त्यांनी लोकशाहीर उमप यांना यावेळी आदरांजली वाहिली. दरम्यान, दुपारी 3 वाजता विक्रोळीतल्या राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यामुळं आज सकाळपासूनच उमप यांच्या चाहत्यांनी विक्रोळीतील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली आहे. काल (शुक्रवारी) त्यांचं नागपुरात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. बुद्धा टीव्ही वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रंगमंचावरच उमप यांनी अखेरचा श्वास घेतला. 'जांभूळ आख्यान, खंडोबाचं लगीन, मातीचे स्वप्न आणि इतरही नाटकांचे त्यांनी शेकडो प्रयोग केले. विविध पुरस्कांरांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

close