विधान परिषदेच्या 8 जागांसाठी आज मतदान

November 27, 2010 8:42 AM0 commentsViews: 1

27 नोव्हेंबर

विधान परिषदेच्या एकूण 8 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. यात 3 शिक्षक मतदारसंघ, 2 पदवीधर मतदारसंघ आणि 3 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघांचा समावेश आहे. जळगाव, यवतमाळ आणि भंडारा-गोंदिया हे स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदारसंघ, कोकण, मराठवाडा आणि नागपूर हे दोन शिक्षक मतदारसंघ, नाशिक आणि अमरावती या दोन पदवीधर मतदारसंघात निवडणूक होणार आहे. जळगाव विधानपरिषद मतदासंघात सर्वाधिक चुरस आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मनीष जैन आणि भाजपचे उमेदवार आणि एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसे यांच्यात लढत होणार आहे. तसेच अमरावती मतदारसंघात गेली अनेक वर्षे सातत्याने निवडून येणार्‍या बी. टी. देशमुख यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागते.

close