जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पबाबत रविवारी मुंबईत बैठक

November 27, 2010 1:11 PM0 commentsViews: 67

27 नोव्हेंबर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या जैतापूर इथे होऊ घातलेला अणुऊर्जा प्रकल्प वादात सापडला आहे. याविरोधात तिथल्या शेतकर्‍यांनी आणि पर्यावरणवाद्यांनी जोरदार निदर्शनं सुरु ठेवली आहेत. पण यासंदर्भात रविवारी म्हणजे उद्या हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर एक बैठक होणार आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीनंतर तिथल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या भवितव्याविषयी घोषणा करण्यात येईल.

close