बुलढाण्यात 250 विद्यार्थ्यांना विषबाधा

November 27, 2010 1:17 PM0 commentsViews: 1

27 नोव्हेंबर

बुलढाण्यात खामगाव तालुक्यातल्या लांजूळ या गावातल्या महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ विद्यालयातल्या 250 विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली आहे. खिचडीत मेलेला साप सापडला. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या विषबाधित विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी ए रामास्वामी आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकर यानी रूग्णालयात भेट दिली.

close