हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचं आंदोलन

November 27, 2010 1:39 PM0 commentsViews: 3

27 नोव्हेंबर

लवासा घोटाळा तसेच टोलनाक्यांची अरेरावी, वाळूमाफियांची दादागिरी आणि सहकारी संस्थांमधली मनमानी या मुद्द्यांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर अण्णांचं हे आंदोलन आहे. हे उपोषण आळंदीला करणार असल्याचं अण्णांनी जाहीर केलंं होतं. मात्र, तिथल्या प्रशासनानं परवानगी नाकारल्यानं, अण्णा राळेगणसिद्धीमध्येच हे उपोषण करणार आहेत. भाजपचे आमदार विनोद तावडे यांनी अण्णांची भेट घेवून त्यांच्याशी या मुद्द्यांवर चर्चा केली. आणि ह्या बाबतीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज आण्णांशी संवाद साधणार आहेत.

close