टू- जी स्पेक्ट्रम प्रकरणी जेपीसी नेमायची विरोधकांची मागणी

November 27, 2010 3:28 PM0 commentsViews: 2

27 नोव्हेंबर

टू- जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी जेपीसी नेमायची विरोधकांची मागणी कायम आहे. त्यासाठी गेले 12 दिवस संसदेचं कामकाज ठप्प झालं . आणि आता तर सत्ताधारी युपीए आघाडीतच यावरुन फूट पडली आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनजीर्ंच्या तृणमूल काँग्रेसनंही संयुक्त संसदीय समितीची अर्थात जेपीसीची मागणी केली आहे. आपण जेपीसीच्या विरोधात नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. गेले 12 दिवस संसदेच कामकाज होऊ शकलं नाही. सभागृह सुरळीत चालावीत यासाठी जेपीसीची मागणी रास्त असल्याचं तृणमूलचं म्हणणं आहे.

close