मराठवाड्याला मिळणार्‍या पाण्याला विरोध नाही- हर्षवर्धन पाटील

November 27, 2010 4:01 PM0 commentsViews: 30

27 नोव्हेंबर

आमची पिढी गेली 25 वर्षे राजकारणात आहे, आम्ही कोण आहोत आणि कसे आहोत हे कोणाला सांगण्याची गरज नाही असा पलटवार सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता केला. मराठवाड्याला मिळणा-या पाण्याला माझ्यासह काँग्रेसचा अजिबात विरोध नाही असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं. या सगळयाला कारण ठरतंय ते मराठवाड्याला देण्यात येणारं 25 टीएमसी पाणी. दोन महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी उस्मानाबादमध्ये मराठवाड्याला 25 टीएमसी पाणी देण्यास पश्चिम महाराष्ट्रातील एका मोठ्या काँग्रेस नेत्याचा विरोध आहे, अशी टीका केली होती आणि त्यांचा रोख होता हर्षवर्धन पाटील यांच्यावर आता या आरोप-प्रत्यारोपांमुळे हा वाद चिघळण्याची चिन्ह आहेत.

close