सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिसचे 26 बळी

November 27, 2010 4:39 PM0 commentsViews: 2

27 नोव्हेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिसचं थैमान सुरूच आहे. लेप्टोनं आज आणखी पाच जणांचा बळी घेतला आहे. आत्तापर्यंत एकूण 26 जण या तापाने दगावले आहे. मात्र अजूनही लेप्टोसदृश्य तापाच्या रुग्णांना रक्तपेशी म्हणजेच प्लेटलेट्स् द्यायची यंत्रणा जिल्हा रुग्णालयानं कार्यान्वित केली नसल्यामुळे तापाचे रुग्ण दगावण्याचा धोका वाढला आहे. आज पुन्हा कणकवलीच्या उपजिल्हा रुग्णालयात तापाचे आणखी 3 रुग्ण दगावले असून देवगडचे 2 रूग्ण दगावले आहे. हे बळी लेप्टोेनेच जातायत की अन्य कोणता विषाणू आहे हे तपासण्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने एनआयव्ही ची मदत घ्यायची ठरवल आहेत. जिल्हाआरोग्य यंत्रणेची ही बेफिकीरी रुग्णांच्या जीवावर बेतत आहे.

close