आशियाई क्रीडा स्पर्धेची दिमाखदार सांगता

November 27, 2010 5:06 PM0 commentsViews: 15

27 नोव्हेंबर

चीनच्या गुआंग्झाओ शहरात गेले 16 दिवस सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचीसांगता झाली. या स्पर्धेवर यजमान चीननं आपलं वर्चस्व राखलं. पण भारतासाठीदेखील यंदाची आशियाई क्रीडा स्पर्धा यशस्वी ठरली आहे. गुआंग्झाओमध्ये रंगलेल्या 16व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 14 गोल्ड, 17 सिल्व्हर आणि 33 ब्राँझ अशा एकूण 64 मेडल्सची कमाई केली. मेडल टॅलीमध्ये भारत सहाव्या स्थानावर आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलला सुरुवात करुन दिली ती पंकज अडवाणीने. बिलियर्डमध्येही पंकज अडवाणीने भारताला या स्पर्धेतलं पहिलं गोल्ड मिळवून दिलं. 2006 ला दोहात झालेल्या एशियन गेम्समध्येही पंकजने गोल्ड मेडल जिंकलं होतं. आणि संपूर्ण स्पर्धेत भारताने यावेळी सर्वाधिक मेडल्स ऍथलेटिक्समध्ये मिळवली.

भारतीय ऍथलीट्सनं तब्बल पाच गोल्ड मेडलची कमाई केली. सुधा सिंगनं महिलांच्या 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये भारताला ऍथलेटिक्समधलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं. त्यानंतर प्रीजा श्रीधरननं महिलांच्या 10 हजार मीटरमध्ये गोल्डची कमाई केली. अश्विनी अकुंजीने महिलांच्या 400 मीटर हर्डल्समध्ये तर अब्राहम जोसेफनं पुरूषांच्या 400 मीटर हर्डल्समध्ये गोल्डन कामगिरी केली. भारताला ऍथलेटिक्समधलं पाचवं गोल्ड महिलांच्या 4 X400 मीटर रिलेमध्ये मिळालं. भारताच्या मनजीत कौर, सिनी जोस, अश्विनी अकुंजी आणि मनदिप कौर या टीमने भारतासाठी हे ऐतिहासिक मेडल जिंकून दिलं.

बॉक्सिंगमध्ये भारताने दोन गोल्ड मेडल्सची कमाई केली. भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदर कुमारने 75 किलो वजनी गटात गोल्ड पटकावलं तर 60 किलो वजनी गटात विकास क्रिशननने गोल्डवर कब्जा केला. एशियन गेम्समध्ये कबड्डी खेळातली आपली मक्तेदारी भारतानं यावेळीही कायम ठेवली. पण यावेळी पुरुषांबरोबरच महिलांच्या टीमनंही गोल्डन कामगिरी केली. पुरूषांच्या टीमने सलग सहाव्यांदा एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावलं तर भारताच्या महिला टीमनेही पहिल्याच वेळी गोल्ड खिशात घातलं.

तर दूसरीकडे टेनिसमध्येही भारताने इतिहास रचला. भारताच्या सोमदेव देवबर्मने दोन गोल्ड मेडल्सची कमाई केली. सोमदेवने पुरूषांच्या सिंगल्स टेनिस स्पर्धेत गोल्ड पटकावलंच पण त्याचबरोबर सनम सिंगबरोबर त्याने डबल्समध्येही गोल्डन कामगिरी केली. रोईंगमध्ये भारतानं पहिलं गोल्ड जिंकत इतिहास रचला. बजरंगलाल ठक्करने पुरूषांच्या स्कल्स प्रकारात हे गोल्ड मेडल पटकावलं. नेमबाजीत भारताला सर्वाधिक मेडल्सची अपेक्षा होती. पण भारतीय नेमबाज फक्त एकच गोल्ड मेडल मिळवू शकले. पुरूषांच्या डबल ट्रॅप प्रकारात रंजन सोधीने गोल्ड पटकावलं.

भारताची गोल्डन कामगिरी

बिलियर्ड्स

पंकज अडवाणी

ऍथलेटीक्स

सुधा सिंग – 3000 मीटर स्टिपलचेस (महिला)प्रीजा श्रीधरन – 10,000 मीटर (महिला)अश्विनी अकुंजी – 400 मीटर हर्डल्स (महिला)अब्राहम जोसेफ – 400 मीटर हर्डल्स (पुरुष)भारतीय टीम – 4 x 400 मीटर रिले (महिला)

बॉक्सिंग

विजेंदर कुमार – 75 किलो वजनी गटविकास क्रिशनन – 60 किलो वजनी गट

कबड्डी

पुरुष टीममहिला टीम

टेनिस

सोमदेव देवबर्मन – पुरुष सिंगल्ससोमदेव/सनम सिंग – पुरुष डबल्स

रोईंग

बजरंगलाल ठक्कर – स्कल्स (पुरुष)

शूटिंग

रंजन सोधी – डबल ट्रॅप (पुरुष)

close