मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही – भुजबळ

November 28, 2010 10:43 AM0 commentsViews: 2

28 नोव्हेंबर

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणातील एकही टक्का कमी करु नका या भूमिकेचा छगन भुजबळ यांनी पुनरुच्चार केला. आज महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त फुले वाड्यात सावित्री बाई आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. त्यानंतर समता परिषदेचा भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मागास वर्गीय आयोग निर्माण केला, पण इतर लोकंच त्याचा फायदा घेतात. मागासवर्गीय आयोगावर भटके विमुक्त लोकांच्या प्रतिनिधींची नेमणूक करावी अशी मागणीही छगन भुजबळ यांनी यावेळी केली. तसेच ओबीसींसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतदू करण्याची मागणीही भुजबळ यांनी केली.

close