भारताचा किवींवर ‘विराट’ विजय

November 28, 2010 11:23 AM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर

भारताने गुवाहटीच्या नेहरु स्टेडियमवर खेळला जाणारा पाच एकदिवसीय मालिकेतील पहिला सामन्यात न्युझीलंडला 40 धावाने हरवले आहे. या विजयाबरोबरच भारतानं 5 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारताच्या यंग ब्रिगेडनं दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. विजयासाठी 277 रन्सचं टार्गेट समोर ठेऊन खेळणार्‍या न्युझीलंडची टीम 236 रन्सवर ऑलआऊट झाली. रॉस टेलरनं एकाकी झुंज देत 66 रन्स केले. पण त्याची खेळी आर आश्विननं संपुष्टात आणली.

भारतातर्फे युवराज सिंग आणि आर आश्विननं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या भारतानं कोहलीच्या विराट सेंच्युरीच्या जोरावर 276 रन्स केले. कोहलीनं 105 रन्सची शानदार खेळी केली. युवराज सिंगनं 42 तर युसुफ पठाणनं 29 रन्स करत भारताचा स्कोर वाढवला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली. तिसर्‍या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या कोहलीनं शानदार सेंच्युरी ठोकत भारताला दमदार स्कोर उभा करुन दिला. कोहलीनं अवघ्या 104 बॉलमध्ये 10 फोर मारत 105 रन्स केले. आपल्या वन डे करियरमधली ही त्याची तिसरी सेंच्युरी ठरली.

खराब फॉर्मशी झगडणार्‍या युवराज सिंगनं या मॅचमध्ये ऑलराऊंड कामगिरी केली. 42 रन्सची उपयुक्त बॅटिंग तर त्यानं केलीच पण बॉलिंगमध्येही त्यानं आपला हिसका दाखवला. 10 ओव्हरमध्ये त्यानं 43 रन्स देत 3 विकेट घेतल्या. पण या मॅचमध्ये भारतीय निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं ते स्पीनर आर आश्विननं. आश्विननं गुप्टील, रॉस टेलर आणि हॉपिकन्सच्या महत्वपूर्ण विकेट घेत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. आश्विननं 10 ओव्हरमध्ये 50 रन्स देत 3 विकेट घेतल्या. एस श्रीसंतनं भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला.

न्युझीलंडच्या तळाच्या बॅट्समननं फटकेबाजी करत भारताचा विजय लांबवला. पण एस श्रीसंतनं न्युझीलंडची शेपूट गुंडाळत भारताच्या विजयावर शिक्काबमोर्तब केलं. श्रीसंतनंही 3 विकेट घेतल्या. त्यानं पाच ओव्हरमध्ये 30 रन्स देत 3 विकेट घेण्यात यश मिळवलं.

close