‘शो मस्ट गो ऑन..’

November 28, 2010 12:50 PM0 commentsViews: 5

28 नोव्हेंबर

काहीही झालं तरी 'शो मस्ट गो ऑन..' असं म्हणताना आपण अनेकदा ऐकलंय. पण मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहातल्या कार्यक्रमात याची प्रचिती आली. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्यावर काल अंत्यसंस्कार झाले.त्यानंतर केवळ 24 तासाच्या आत त्यांचा मुलगा नंदेश उमप यानं कापूस महासंघाच्या कार्यक्रमात पोवाडा गाऊन आपलं कर्तव्य बजावलं. या क्षणी सगळ्यांनाच आठवण झाली ती विठ्ठल उमप यांच्या खड्या आवाजाची. अखेरचा श्वासही रंगमंचावरच घेतलेल्या विठ्ठल उमप यांच्यासाठी यापेक्षा समर्पक श्रद्धांजली कोणतीच नसू शकते.

close