वाशीममध्ये शाळेत गॅस सिलेंडरचा स्फोट

November 28, 2010 3:48 PM0 commentsViews: 3

28 नोव्हेंबर

वाशीम इथल्या प्राथमिक शाळेत सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झालेत. ही शाळा वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे. या आगीमुळे शाळेतील संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाला. या शाळेत 1 ली ते 7 वीचे वर्ग असून त्यात 350 विद्यार्थी शिकतात. आगीमुळे शाळेचं 4 ते 5 लाखाचं नुकसान झाल्याचा अंदाज शाळा व्यवस्थपनानं व्यक्त केला आहे.

close