कलमाडींवर कारवाई होण्याची शक्यता

November 28, 2010 4:17 PM0 commentsViews:

28 नोव्हेंबर

कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. एशियन गेम्ससाठी चीनला गेलेले कलमाडी आज रात्री दिल्लीत परतणार आहेत. दिल्लीत आल्यावर त्यांच्यावर सीबीआय काय कारवाई करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. क्वीन्स बॅटन रिले घोटाळा आणि फसवणूक-प्रकरणी कलमाडींच्या तीन वरिष्ठ सहकार्‍यांना अटक करण्यात आली. कॉमवनवेल्थमधल्या वादग्रस्त कागदपत्रांना कलमाडींनीच मंजुरी दिली होती, अशी माहिती त्यांच्या सहकार्‍यांनी चौकशीत दिल्याचं समजतंय. त्यामुळे आता सीबीआय कलमाडी यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

close