नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या

November 29, 2010 10:20 AM0 commentsViews: 2

29 नोव्हेंबर

अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये द्राक्ष उत्पादनाला जबर फटका बसला आहे. आणि त्यामुळे शेतकर्‍यांचं मोठ नुकसान झालं. नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसात दोन द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. दत्तू पान-गव्हाणे आणि ज्ञानेश्वर अडके अशी या शेतकर्‍यांची नावं आहेत. अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीमुळे खचून त्यांनी आत्महत्या केल्याची त्यांच्या कुटुंबीयांची तक्रार आहे.

शेतकर्‍यांचा रास्ता रोको

आग्रा महामार्गावर पिंपळगाव जवळ द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

close