2 जी स्पेक्ट्रम प्रकरणी रतन टाटांची सुप्रीम कोर्टात धाव

November 29, 2010 10:51 AM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर

नीरा राडिया यांच्याशी झालेलं संभाषण प्रसिद्ध केल्या प्रकरणी रतन टाटा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. नीरा राडीया आणि त्यांच्यादरम्यान झालेल्या टेलिफोन संभाषणाची टेप प्रकाशीत न करण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. 2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणण्याची इच्छा नसल्याचंही टाटांनी स्पष्ट केलं. नीरा राडियांशी झालेलं संभाषण मीडियासमोर आल्यानं टाटा नाराज झाले आहेत. टाटा ग्रुपच्या पीआरचं कामकाज राडिया पाहतात.

close