वर्धा जिल्हयात अवकाळी पावसाचा कहर

November 29, 2010 10:59 AM0 commentsViews: 2

29 नोव्हेंबर

वर्धा जिल्हयात अवकाळी पावसानं 45 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहेत. प्रामुख्याने कापूस आणि सोयबिन ही पिक पावसाच्या तडाख्यात सापडली. अवकाळी पावसामुळे जिल्हयातला शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. जिल्हयात सोयाबीन आणि कापसाचं पीक मोठ्या प्रमाणावर पिकतं मात्र पावसामुळे या पिकांची नासाडी झाली आहे. नुकसानकग्रस्त शेतकर्‍यांच्या शेताचा सर्व्हेही अद्याप करण्यात आलेला नाही. नैसर्गिक संकटात सापडलेल्या वर्ध्याच्या शेतकर्‍याला आता या सुल्तानी संकटालाही सामोरं जावं लागत आहे .

close