कोल्हापूरात द सुपरक्रॉस चॅम्पियनशीपचं आयोजन

November 29, 2010 11:44 AM0 commentsViews: 1

29 नोव्हेंबर

मोटारसायकलीच्या चित्तथरारक कसरती, श्वास रोखायला लावणारा वेग आणि अडथळ्यांच्या शर्यतीचा थरार कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळाला. कोल्हापूरातल्या मोहीते रेसिंग ट्रॅकवर एम.आर.एफ टायरच्यावतीनं 'द सुपरक्रॉस चॅम्पियनशीप' स्पर्धेच्या पाचव्या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये नामवंत स्पर्धकांसह 120 स्पर्धकांनी भाग घेतला होता. फॉरीन ओपन, नो-व्हाईस इंडियन एक्सपर्ट अशा प्रकारात ह्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत कोईम्बतुरच्या संतोष सी.एस. नं बेस्ट रायडर ऑफ दि रेस,आणि कोल्हापूरच्या सचिनघोरपडेनं लोकल बेस्ट रायडरचा किताब पटकावला.

यापूर्वी पहिली फेरी 30 मे रोजी बेंगलोर इथं झाली होती. दुसरी फेरी 10 जुलैला कोईमतुर इथं झाली. तिसरी फेरी 25 जुलैला जयपुर इथं तर चौथी फेरी 31 ऍक्टोबरला बडोदा इथं पार पडली. 12 डिसेंबरला सहावी आणि अंतीम फेरी पुण्यात पार पडणार आहे.

close