कबड्डी टीमचं जल्लोषात स्वागत

November 29, 2010 11:53 AM0 commentsViews: 5

29 नोव्हेंबर

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला आणि पुरुषांच्या कबड्डी टीमने गोल्ड मेडल पटकावलं. आणि मेडल विजेती भारतीय टीम आज सकाळी भारतात परतली. महिलांच्या कबड्डी टीममध्ये महाराष्ट्राच्या तीन खेळाडू होत्या. स्नेहल साळुंखे आणि महिला टीमच्या कोच मीना दास यांचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पुरुषांच्या टीमचा सदस्य नीतिन घुलेही मुंबईत परतला. या तिघांचा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला. विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी जमली होती.

close