ठाण्यात दोन संशियत दहशतवाद्यांना अटक

November 29, 2010 1:18 PM0 commentsViews: 1

29 नोव्हेंबर

लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन एटीएसनं ठाण्यातून दोघांना अटक केली आहे. मोहंमद शरीफ ठक्कर आणि मोहम्मद इसाक तुमलाख अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघं आईल टँकरचे ड्रायव्हर म्हणून काम करकत होते. त्यांना कापूरबावडी इथून अटक करण्यात आली.

या दोघांना त्यांना 15 नोव्हेंबरला सनसिटी मॉलमधून अटक करण्यात आली. मोहम्मद शरीफ आणि मोहम्मद इराक मोहम्मदरशीद अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांनी मुंबईसह पुणे, नाशिक या शहरांमध्येही रेकी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील तेल शुद्धीकरण कारखानेही त्यांच्या टार्गेटवर होती असा संशय आहे. या दोघांनाही 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

close