देशाच्या संरक्षण सेवेत रूजू होण्यासाठी एनडीएचे कॅडेट्स सज्ज

November 29, 2010 8:01 AM0 commentsViews: 3

29 नोव्हेंबर

तीन वर्ष खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर देशाच्या संरक्षण सेवेत रूजू होण्यासाठी एनडीएचे कॅडेट्स आता सज्ज झाले. नॅशनल डिफेन्स ऍकॅडमी अर्थातच एनडीएची 119 वी पासींग आऊट परेड पुण्यात खडकवासल्यात पार पडली. हवाईदल प्रमुख पी.व्ही. नाईक यांनी कॅडेटची सलामी स्वीकारली. 3 वर्ष खडतर ट्रेनिंग घेतल्यानंतर आजचा दिवस हा या कॅडेटसाठी अत्यंत महत्वाचा असतो. या नंतर ते लष्करी दलाच्या तीन दलापैकी सेवेत दाखल होतात. या परेडला कॅडेटचे कुटुंबियही उपस्थित होते.

एनडीएच्या इतिहासात शनिवारचा दिवस सोनेरी अक्षरांनी लिहावा असा होता. कारण तिन्ही सेनादल प्रमुखांना भेटण्याची संधी विद्यार्थ्यांना पासिंग आऊट परेडच्या निमित्तानं मिळाली. सेनादल प्रमुखही एनडीेएचे विद्यार्थी असल्यानं जुन्या आठवणींमध्ये तेसुद्धा रमले.

इथं रुळलात का? कसं वाटतंय इथे ? एनडीएच्या विद्यार्थ्यांची आपुलकीनं चौकशी सुरु होती. आणि चौकशी करत होते तिन्ही सेनादलांचे प्रमुख..हवाई दल प्रमुख पी.व्ही नाईक, नौदल प्रमुख ऍडमिरल निर्मल वर्मा आणि लष्करप्रमुख व्ही. के. सिंग…एनडीएमध्येचं शिकलेले हे तिघं एकत्र आले. आणि विद्यार्थ्यांमध्ये अगदी सहजपणे मिसळले.

close