जी. ए. कुलकर्णी शाळेच्या फी वाढीविरोधात पालकांचं आंदोलन

November 29, 2010 3:42 PM0 commentsViews: 2

29 नोव्हेंबर

मुंबईत खारमध्ये जी. ए. कुलकर्णी शाळेनं केलेल्या फी वाढीविरोधात पालकांनी आंदोलन केलं शाळेने पालकांना कोणतीही सूचना न देता अचानक फी वाढ केली. याबद्दल नाराज झालेल्या पालकांनी, शाळा प्रशासना विरोधात आंदोलन केलं. या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सामील झाली होती. शाळेने विद्यार्थ्यांची फी पाचशे रुपयांवरुन अचानक नऊशे रुपये केली. पण या निर्णयाआधी पालकांना विश्वासात घेण्यात आलं नाही असा आरोप पालकानंी केला. शाळा प्रशासनानं यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.

close