जैतापूर प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम

November 29, 2010 3:58 PM0 commentsViews: 65

29 नोव्हेंबर

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरण मंत्रालयानं मंजुरी दिल्यानं प्रकल्प उभारणीतले अडथळे दूर झाले पण स्थानिक नागकिरांचा या प्रकल्पाला विरोध कायम आहे. जमिनीच्या मोबदल्याचे चेक्स कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नसल्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादात सापडला. प्रकल्पाच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून गावकर्‍यांचं आंदोलन सुरू आहे. पण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं काही अटी घालून प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला.या प्रकल्पासाठी 5 गावातल्या 938 हेक्टर जमिनीचं संपादन सरकारनं केलं आहे. पण 2 हजार 880 शेतकर्‍यांपैकी फक्त 80 जणांनीच मोबदला स्वीकारला. त्यामुळे गावकर्‍यांच्या विरोधाची धार अजूनही कायम असल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, बाहेरची लोकं येऊन इथल्या स्थानिकांना चिथावणी देत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजिदत पवार यांनी केला.फ्रान्सच्या अरेवा कंपनीच्या सहकार्यानं 9 हजार 900 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प उभारला जात आहे. फ्रान्सचे अध्यक्ष निकोलस सार्कोझी भारतभेटीवर येण्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पाचं काम येत्या सात वर्षांत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. पण गावकर्‍यांचा विरोध मावळला नाही तर त्यात अडचणी येऊ शकतात.

close