दूरसंचार मंत्रालयाची 85 टेलिकॉम कंपन्यांना नोटिस

November 29, 2010 4:33 PM0 commentsViews: 4

29 नोव्हेंबर

दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. 2-जी स्पेक्ट्रम वाटपात घोटाळा झाल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. आणि अपात्र असणार्‍या 85 लायसन्सधारकांना नोटिस बजावली. एस-टेल, युनिनॉर, लूप आणि व्हिडिओकॉन या कंपन्या निकषाला पात्र नसल्याचा ठपका कॅगनं आपल्या अहवालात ठेवला होता. या कंपन्यांचं लायसन्स रद्द करण्याचा इशारा कपील सिब्बल यांनी दिला.

2-जी स्पेक्ट्रम घोटाळा

- 122 नव्या लायसन्सचं वाटप झालं होतं

- त्यापैकी 85 लायसन्स निकषाला अपात्र ठरलेल्या कंपन्यांना दिले

- युनिटेक ग्रुपच्या कंपन्यांनी 20 सर्कल्ससाठी अर्ज केला होता

- त्यापैकी 6 कंपन्या अपात्र होत्या

- 12 कंपन्यांनी आर्थिक दिशाभूल केल्याचा कॅगचा ठपका.

- बिडर्सनी किमान 3 ते 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करणं आवश्यक होतं

- पण अनेक कंपन्यांनी हा निकष पूर्ण केला नाही

- एका क्षेत्रात एकापेक्षा जास्त कंपन्यांमध्ये स्टेक्स घेता येणार नाही, असा नियम आहे

- हा नियम स्वॅन टेलिकॉमनं धाब्यावर बसवला

close