आदर्श सोसायटीच्या फाईलची पानं गायब केली – वाय.पी.सिंग

November 29, 2010 5:12 PM0 commentsViews: 1

29 नोव्हेंबर

आदर्श सोसायटीच्या घोटाळ्यामुळेच अशोक चव्हाण यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. केवळ अशोक चव्हाण नाही तर, त्यांच्यासोबत इतर काही जण असल्याचा आरोप ही झाला. तर काही अधिकारी ही त्यात सामील आहेत. आता सीबीआय याची चौकशी करत आहे. विशेष म्हणजे चौकशी सुरु असतानाच आदर्शच्या फाईलमधली काही पानं गहाळ झाली आहेत. तशी तक्रार नगरविकास खात्यानं पोलीसात दिली. ही पानं गहाळ नाही तर ती गायब केल्याचा आरोप वाय.पी.सिंग यांनी केला.

ही फाईल सतत फिरत होती. सरकारी कागद पत्र गायब झाल्यास त्या बाबत महाराष्ट्र पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट आहे. त्या ऍक्टच्या कलम 5 नुसार तक्रार करायला हवी होती. पण तशी कोणती ही कारवाई झालेली नाही. यामुळे या प्रकाराबाबत संशय बळावतोय. मंत्रालयातून राज्याचा सगळा कारभार चालतो त्या इमारतीच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेतली जाते. त्यामुळे या ठिकाणाहून फाईलमधली कागदपत्रं गहाळ कशी होतात असा सवाल आता उपस्थित होत आहे.

close