अरुंधती रॉय आणि गिलानींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

November 29, 2010 5:25 PM0 commentsViews: 4

29 नोव्हेंबर

काश्मीर प्रश्नी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय आणि फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी अडचणीत आले आहे. गिलानी आणि रॉय यांच्याविरोधात दिल्ली पोलीसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. पटियाला हाऊस कोर्टानं दिलेल्या आदेशानंतर पोलीसांनी ही कारवाई केली. चौकशी करून दिल्ली पोलिसांना सहा जानेवारी पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही कोर्टानं दिले. दिल्ली पोलीसांनी यापूर्वी रॉय आणि गिलानी यांना क्लीन चीट दिली होती. दिल्लीत काश्मीरवरच्या एका चर्चासत्रात या सर्वांनी भारतविरोधी वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

close