विकीलिक्स वेबसाईटचा अमेरिकेला धक्का

November 29, 2010 5:36 PM0 commentsViews: 1

29 नोव्हेंबर

विकीलिक्स या वेबसाईटनं अमेरिकन सरकारला धक्का दिला. अमेरिकेचे गुप्तचर दुसर्‍या देशात कशी हेरगिरी करतात, याची माहिती विकीलिक्सनं वेबसाईटवर प्रसिद्ध केली. अमेरिकेच्या राजदूतांनी वॉशिंग्टनला पाठवलेल्या गोपनीय माहितीचा यात समावेश आहे. यामुळे संतापलेल्या अमेरिकन नेत्यांना कायदेशीर मार्गांचा वापर करून विकीलिक्सवर बंदी घालण्याची शिफारस ओबामा प्रशासनाकडे केली.

close